" गॅजेट "
🖥️ 📱 💻
इच्छापूर्ती करणारे
अति महत्वाचे गॅजेट
सर्वांच्या हातचे
खेळणे जेव्हा होईल ,
तसतसे वापरणारे म्हणतील ...
सांगा कशाला पाहिजे
एवढी तरक्की की
झटपट सारे समोर येईल ,
उत्सुकता , प्रतीक्षा ज्याला म्हणतात ,
ती मानवी स्वभावातून
कायमची विरून जाईल .
अडचणी विचारपूस करण्याचे
दिवसच आता दुसऱ्यांच्या
मदती शिवाय चालून जातील ,
शेजार पाजार , ओळखीचा
आता काही काळानंतर
नको लुडबुड वाटताना
इतिहास जमा होईल ,
सर्च इंजिन , यु ट्यूब ,
इंटरनेट , मीडिया ,
सारे काही तात्काळ
कोठेही समोर दाखवत राहील
नवीन मार्केटिंगच्या फंडयाने
पैसे देता घरापोच सेवा
प्रत्येकाला उपलब्ध होईल ,
शाळा , गुरुकुल , विद्यापीठे , मठ
नावापूर्तीच कागदावर
सांगा कसे दिसतील ?
गुरू , शहाणी माणसे ह्यांचे देखील
सवांद नेटवर व्हिज्युअली
ज्ञानात किती खोल पर्यंत
खरेच उतरतील ?
मुलांचे बालपण , मैदानी खेळ
यांना नवीन जगात जागाच नाही ,
गॅजेट आणून दिले की
व्हिडिओगेम , कार्टुन चॅनेल ने
त्यांचा शाररिक विकास होऊन
नवीन पिढी कशी घडेल
हे कितपत सांगता येईल ?
खरा संवादाचा तुटणारा धागा
गॅजेटने कसा पहिल्या सारखा
सांगा आपलेसा होईल ?
आठवणींना प्रत्यक्षात
पुन्हां पाहण्याला किती
वाट पाहावी लागेल
हे कोण सांगिल ?
अभिनंदन , श्रद्धांजली
सुख्या भावनेच्या पोस्टद्वारे
वरवरचे पोहचल्यावर सांगा
वाचून पाहून खरचं बरं वाटेल ?
स्ट्रिकर , थम्ब , फ्लॉवर्स ने
प्रत्यक्षातील गाठी ~ भेटी तील
ओढ मजाच घालवून टाकली ,
हे तरी आता मान्य होईल ?
संवादातील शब्दांना आता
गोडवा , लेहजा , भारदस्तपणा ,
आपलेपणातील ओलावा
ऐकायलाचं ओहोटी लागण्याची
परिस्थिती येवू घातली की काय ?
असेच चित्र दिसू लागल्याची
सध्या भीती किती जणांना जाणवेल ?
असतीलही खूप फायदे गॅजेट चे
पण माणसातील माणूसपण ,
भावना , नाते , जिव्हाळा ,
जिवंतपणातील अनुभवण्याचे प्रेम
हे मात्र तसेच राहू देत म्हणजे झाले ,
मानवाचा यंत्रमानव होऊ नये म्हणजे मिळवले ,
हे गॅजेट ला नाही माणसाला कळू दे
एवढेच बसं होवू दे ...
📝🙏🌷 संजय होनकळस
१४.०७.२०. पुणे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा