// श्री निमिषबां देवी प्रसन , श्री मुक्तेश्वर प्रसन्न //
“ गौरव गाथा सोमवंशी आर्य क्षत्रियांची ”
विश्वरुपी शिवाचे अंश आपण
कुळप्रमुख राजा मौक्तिकाची वंशावळ
देवी निमिषबांचा पाठी वरदहस्त
कलाकुसरीने ज्ञातीस वरदान
लढवय्या बाणा अंगी जन्मजात
मिळाला आर्य क्षत्रिय संज्ञकास
पूर्वजांनी केला दाहीदिशा लौकिक संचार
रचून समाजोपयोगी उद्योग व्यवसायाची मुहूर्तमेढ
चला ... बाळगूया विकासाची वृत्ती मनात
साधू प्रत्येक कुटुंबाची उन्नती होऊन संघटीत
मानसन्मान इतिहासाची नवी पुनरावृत्ती उतरुया सत्यात
देव - धर्मस्थळे - कौशल्यशाळा उभारूया समाजात ,
आदियोगी सोमवंशी आर्य क्षत्रिय आपण
सार्थ अभिमान आहे स्त्री - पुरुषांच्या श्वासात
प्रत्येकातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ लावू या जन्मी पणास
करू वंदन शिवशंकर - राजा मौक्तिकास ...
अजरामर होवो " सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज "
शुभम भवतु , शुभम भवतु , शुभम भवतु …
कवी : संजय चंद्रकांत होनकळस
निगडी , पुणे . ९८५००३९७६६
दिनांक : ०२ / ०५ / २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा