श्री गणेश प्रसन्न
" गुरू पौर्णिमा "
गुरू आशिर्वादाने व्यापला
प्रत्येकाचा आरंभ ते शेवट
ज्यांनी केले सोपे जीवन
ते सर्व माझ्या गुरुस्थानी ,
आयुष्य म्हणजे
जडणघडणीचा मार्ग
अस्तित्वाच्या लढाईत
मार्गदर्शकाचे अनन्यसाधारण महत्व ,
शिक्षक वा विभूती अवतार
स्विकारून पालकत्व त्यांनी
अज्ञान दूर करण्या दिला
ज्ञानाचा मार्ग ~ प्रकाश ,
कुशलता रुजवूनी अंगी
ज्यांनी दाखवले आनंदाचे झरे
पदोपदी गुरू स्मरण करूनी
देवू पालक संस्कारास धन्यवाद ...
कवी : संजय चं होनकळस
०५.०७.२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा