' रेल्वे पटरी '
दूर दूर जाण्यासाठी
आगगाडी तयार झाली खरी
तिला धावण्यासाठी मात्र प्रथम
लोखंडाची पटरी तयार करावी लागली ,
न्यारो गेज - ब्रॉड गेज
गावो गाव पर्यंत टाकली गेली
कोळसा वाफेवर धावणारी नंतर
डिझेल आणि विद्युतीकरनावर चालू लागली ,
लाकडी कधी सिमेंट च्या पट्ट्या
त्यावर लोखंडी रूळ ठेवूनी
जखडून ठेवण्या कड्या लावल्या पायी
छोटे छोटे दगड टाकले अवती भोवती ,
हॉर्न वाजतो दूर पर्यंत ऐकू येतो
सिग्नल साठी लाल पिवळा हिरवा दिवा दिसतो
रेल्वे फाटक गाडीला वाट करून देतो
लाईन मॅन झेंडा दाखवीत सूचना करीत असतो ,
गाव कोणते स्टेशन कोणते पाटी मोठी सांगते
प्लॅटफॉर्म नंबर वर गाडी सुखरूप उभी राहते
सुखसोईनी उपयुक्त सारी सोय तेथे असते
सामानाची प्रवाश्यांची लगबग घडून येते ,
तिकीट घ्यावे निर्धास्त प्रवासाला बसावे
हिरवी झाडे डोंगर नदी सागर सारे पाहत जावे
नाष्टा जेवण बसणे झोपणे सोईस्कर सारे तेथे
गप्पा गोष्टी नवी ओळख सारे येथे सोपे होते ,
समांतर ह्या पटरी असूनही कधी
छेदतात दुसऱ्या पटऱ्यांना वळण्यासाठी
मार्गस्त व्हावे सर्वांनी संकेत स्थळी
हीच असते रेल्वे पटऱ्यांची महती ...
© कवी : संजय होनकळस
२३.०९.२१ , निगडी , पुणे ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा