' सराव ~ प्रॅक्टिस '
संदर्भ : ( ध्यानचंद hockey , सचिन Cricket ,
पिकासो Painter )
गजानन ( Engineer ) नीरज ( IIT - CS. )
होय हे खरं आहे ...
जे ध्येय आहे ठरविलेले
तिथ पर्यंत नक्की पोहचता येते ,
मार्गदर्शन घेवून प्रयत्न करून
कुशलता सरावानेच येते ,
शरीर मन साहित्य परिस्तिथी
सदैव जैय्यत तयारीनीशी ठेवावी लागते ,
प्रत्येक वेळी ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी
मूल्यमापनासहित प्रगती करावी लागते ,
स्वतःच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी
स्वतःचीच परीक्षा घ्यावी लागते ,
दृष्टी पटलात जपून यश सर्वदा
स्पर्धा अंगात भिनवावी लागते ,
आत्मविश्वासाने मार्ग सुकर करून
अंतिम ध्येय हमखास मिळविता येते ,
बाकी सारे बाजूला सारून वेळ साधून
सराव ~ प्रॅक्टिसला प्राधान्य द्यावेच लागते ...
© कवी : संजय होनकळस .
२५.०९.२१ निगडी , पुणे ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा