सोमवार, १२ एप्रिल, २०२१

झाडांची बेटे

 ' झाडांची  बेटे  ' 

टापू  टापू  वर  असुद्या  
झाडांची  बेटे 
जशी  खेडोपाडी  माणसांची 
छोटी  वस्ती  तील  घरे  , 
झाडेही  वाढतील  
हिरवीगार  बहरतील  
त्यांच्या  छत्रछायेत  अन्य 
प्राणिजन्य  संसार  थाटतील  ,
उन्हाळा   झेलूनी   सोसत
सहकारी  वृक्ष  सोबत  करतील 
पाऊस  बरस्ताना 
ती  ही  आनंदाने  डोलतील , 
समूह  हा  भावतो  सर्वांना
सृष्टीच्या   पावली  यावा  थवा 
हिरवं  आणि  आकाशी  रंगाचा  
नेहमीचा  असावा  जिव्हाळ्याचा  ओलावा , 

©  संजय होनकळस  
१० एप्रिल २१ 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

" यंत्रमानवाकडे वाटचाल "

" यंत्रमानवाकडे वाटचाल " पंचाग दिनदर्शिका सांगे सूर्योदय चंद्रोदयाचे आगमन शहरीकरणामुळे माणसांसाठी मात्र तो होतो एक...