' हिशेब आयुष्याचा '
सोने व्हावे जीवनाचे
प्रत्येकाची ख्वाईश असते
इच्छेने जगतोय हिशोब लागण्यासाठी
काही नियम ठेवावे मात्र आपल्या हाती ,
जगण्याला संवादाचे कोन असावेत
हेच बऱ्याच जणांना माहीत नाही ,
संवेदनेने कळतात सारे भेद
हेच उमजून घ्यावे पहिल्यांदी ,
आयुष्याला आयाम फुलवतात
ज्यांनी भरभरून जगता येते
हृदयातील तरंगांना छेडले असता
खुशीने मनसोक्त भिजता येते ,
साथ सोबत तर असावीच असावी
अडचणींच्या रस्त्यांवरी एक होऊनी
लढण्यातील मजा , गहिवरने डोळे मन चित्त
न्हाहून चिंब सुखावून जाणे हवेच हवे ,
प्रसंगांची परीक्षा निभावावी अशी की
पाय - तत्वे - आत्मसन्मान शाबूत ठेवावी
सर्वांना सामावून घ्यावे मग
सर्वांनी सुखावून एकत्र गाणी गावी ,
छंद आवड रसिकता परोपकार
करीत बुडून आनंदता येते
सहजासहजी घेता देता आले की
संपन्नता अंगी भिनते ,
शब्द भांडार चर्च्या संवाद अनुभवाने
समृद्ध व्हावे प्रसंगी देशाटन
सेवाकार्ये सहभाग मिळाले की
व्यक्तिमत्व खुलताना भारी लखलखते ,
नाव व्हावे , सामाजाचे देणे द्यावे
सर्वोतोपरी जमेल तेवढे करावे
मिळालेल्या आयुष्याचे दालन फुलवताना
एकमेकांस सहकार्य करीत समाधानावे .....
© संजय होनकळस
११ एप्रिल २१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा