' चंद्राशी नाते '
आजच आमंत्रण
अनोखं म्हणावं लागेल
पौर्णिमेच्या चंद्राने ९ :१० वा रात्री
वेळेत भेटायला बोलावलंय
म्हणाला ...
वेळ काढून ये ,
गप्पा मारूयात आवरून मात्र ये ,
विचारांची गर्दी घरीच ठेवून ये ...
जीवनात संध्याकाळ - रात्र देखील
रमणीय असते आज अनुभवून घे ,
पौर्णिमेच्या चंद्राला डोळ्यात साठवून घे ,
तळ्याकाठी पाण्याला चंदेरी झालेलं पाहून घे ,
तुझे माझे प्रतिबिंब मनात भरून घे ,
चांदण्याचे लुकलुकने मनसोक्त पाहून घे ,
संवादाचे साद मनी जुळवून घे ,
आल्हाद वारा सांगतो ते हळुवार ऐकून घे ,
पाण्याचा शीतल उबदार स्पर्श अनुभवून घे ,
मनाला हव्या असलेल्या शांततेची अनुभूती घे ,
पंचमहाभूतांचा चंद्र सवंगडी जाणून तर घे ,
मनातील काही बोलायचे असेल तर
मनमोकळं होऊन प्रतिउत्तराने आनंदी होऊन घे ,
जीवनाला शीतलता हवी असेल तर
चंद्राशी नाते करून आयुष्य जगणे शिकून घे ...
कवी : संजय होनकळस
२४/०७/२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा