// श्री गणेश प्रसन्न // २६/०७/२०१८ रात्रौ ८ : ५५ वा
शिर्षक : 😀 " हास्य " 😀
हसतो मी - हसवतो मी
दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर
हसू पाहू
इच्छितो मी ,
भेटतो जो ही त्याची
विचारपूस करतो मी
हास्याचे बीज
प्रत्येकास देतो मी ,
हास्य गुणधर्माचे फायदे
सर्रास पटवून देतो मी
हसताना किती सुंदर दिसताय
ह्याचे फोटो सुद्धा काढतो मी ,
ताण - राग - भांडणे सोडवताना
विनोदाचे औषध
डोस म्हणून
सर्वांना देतो मी ,
निराशेला आशेत बदलताना
वातावरणात हास्याने
उत्साह - प्रसन्नता
पसरवितो मी ,
दुरावलेल्या
संबंधांना सांधताना
खेळीमेळी - कोपरखळी - मिश्किलतेने
पेश करतो मी ,
हृदयातून आनंदाच्या तारा छेडताना
मानवाला मिळालेल्या हास्य वरदानाचे
स्मरण सदैव करतो मी
हसतो मी - हसवतो मी ... 😀
कवी : संजय होनकळस ,
निगडी , पुणे , ९८५००३९७६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा